मतिमंद, सोम्य दृष्टीदोष, अध्ययन अक्षम, जन्मजात अपंगत्व, स्वमग्न अशा मुलांची आरोग्य तपासणी शिबीर इचलकरंजी येथे झाले. जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचालित सन्मती मतिमंद विकास केंद्र अशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा व संवाद सामाजिक मंडळ यांच्या वतीने याशिवाय शिबिराचे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६० दिव्यांग मुलांची तपासणी करून त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले . आज अनेक मुले जन्मताच अपंग असतात, त्यांच्यात अनेक व्यंग असतात त्याबाबत योग्य वेळी उपचार झाल्यास त्यांच्या जीवनाला ही दिशा मिळते. त्यासाठी वरील तिन्ही संस्थानच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या तपासणीत सांगलीचे
प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉक्टर महेश साळे त्यांनी तपासणी केली.